हिंदुत्व व मार्क्सवाद हे भारतीय समाजकारण आणि राजकारणातले दोन ध्रुव आहेत, आणि गेली शंभर वर्षे समाजकारण-राजकारण हे या दोन ध्रुवांमध्ये फिरते आहे...
हिंदुत्व व मार्क्सवाद या दोन ध्रुवांमध्ये काँग्रेस नावाचे विषुववृत्त आहे, पण ते या दोन ध्रुवांसारखे स्थिर नाही. ते कधी कर्कवृत्ताकडे सरकते, तर कधी मकरवृत्ताकडे. त्याशिवाय इतर अनेक छोटे पक्ष आणि प्रादेशिक पक्षांचे अक्षांश-रेखांशसुद्धा साथीला आहेत. हे पुस्तक या दोन ध्रुवांत फिरलेल्या गेल्या शंभर-दीडशे वर्षांतील भारतातील राजकारण आणि समाजकारणाचा इतिहास आहे.......